जास्त वेळ आंघोळ करताय? त्वचेचे होऊ शकते मोठे नुकसान !
जास्त वेळ आंघोळ करताय? त्वचेचे होऊ शकते मोठे नुकसान !
त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते: जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल (सीबम) निघून जाते. यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. कालांतराने त्वचा इतकी कोरडी होते की, डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ येऊ शकते.
खाज सुटण्याची समस्या वाढते : त्वचा कोरडी झाल्यामुळे खाज सुटण्याचे प्रमाण वाढते. अनेकदा जास्त भांड्यात पाणी पिताना करू नका या चुका फिटनेस त काही साम पहिर भांड्यात अजिक पाण्याशी प्रतिक्रिय तांब्याच वेळ आंघोळ केल्याने त्वचेचा बाह्य थर कमकुवत होतो, ज्यामुळे खाजेसोबतच त्वचेवर जळजळदेखील जाणवू शकते.
सुरकुत्या वाढण्याचा धोका : त्वचा विशेषज्ञ सांगतात की, जास्त वेळ पाण्यात राहिल्याने त्वचेवर, विशेषतः पायांवर सुरकुत्या पडू शकतात. पाय जास्त वेळ ओले राहिल्यास तेथील त्वचा सैल पडते आणि सुरकुत्या वाढतात.
संसर्गाचा धोका वाढतो : अतिआंघोळीमुळे त्वचेचा संरक्षक थर कमकुवत होतो. यामुळे जिवाणू (बॅक्टेरिया) आणि बुरशीजन्य (फंगल) संसर्ग होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे त्वचेच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
काय काळजी घ्यावी?
आंघोळीची वेळ १०-१५ मिनिटापेक्षा जास्त ठेवू नका.
शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करा; गरम पाण्याचा वापर टाळा.
आंघोळीनंतर त्वचेच्या प्रकारानुसार मॉईश्चरायझर लावा.
संवेदनशील त्वचा असल्यास साबणाचा वापर कमी करा.

Post a Comment