पन्नाशी ओलांडली तरीही सोनाली बेंद्रेचे प्रेमात पाडणारे सौंदर्य

सोनाली बेंद्रे १९९० ते २००० या संपूर्ण दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.


तिने केवळ अभिनयातच नव्हे तर मॉडेलिंग, टेलिव्हिजन आणि लेखन क्षेत्रातसुद्धा आपली वेगळी छाप पाडली आहे. हीच सोनाली बेंद्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही वर्षांत सोनालीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. तिने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात ती पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. सोनाली बेंद्रे हिचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे वडील कार्पोरेशनमध्ये अधिकारी होते, त्यामुळे विंचवाचे बिन्हाड पाठीवर... सतत बदल्यांमुळे अनेक शहरात त्यांनी वास्तव्य केले.

सोनाली हिने सुरुवातील मॉडेलिंगमधून आपली कारकीर्द सुरू केली. तिच्या सौंदर्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिला लवकरच चित्रपटसृष्टीत संधी मिळाली. १९९४ साली 'आग' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'दिलजले', 'सरफरोश', 'हम साथ साथ हैं', 'मेजर साब', 'जख्म' अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तिने काम केले. तिचा अभिनय सहज, नाजूक आणि दिलखुलास असायचा.

सोनाली बेंद्रे ही तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयासाठी प्रसिद्ध होती. तिचा चेहरा हसतमुख, बोलके डोळे यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. 'हम साथ साथ हैं'मधील तिची भूमिका विशेष गाजली. तिच्या नोडीला सलमान खान, अजय वगण, अक्षय कुमार, अजय देवगण नांसारखे मोठे अभिनेते होते.

चित्रपटांव्यतिरिक्त सोनालीने टीव्हीवरही यशस्वी पदार्पण केले. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली, जसे की इंडियाज बेस्ट ड्रामेबाज, इंडियाज गॉट टॅलेंट इ. शोमुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय, तिने 'द मॉडर्न गुरुकुल - माय एक्सिप्रिमेंट वुईथ परेंटिंग' हे पुस्तक लिहिले असून त्यात तिच्या पालकत्वाच्या अनुभवांचे वर्णन आहे.

सोनाली आणि राज ठाकरे यांच्या प्रेमाच्या कथाही मोठ्या चवीने वर्णील्या जातात. परंतु या दोघांनी याचा कधी इन्कारही केला नाही आणि स्वीकारही केला नाही. नुकत्याच झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने दोघांमधील 'आँख मिचोली' मात्र कॅमेऱ्यातून सुटली नाही. सोनाली बेंद्रे हिने चित्रपट निर्माता गोल्डी बहल यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना एक मुलगा आहे. २०१८ साली तिला कॅन्सर झाल्याचे समजले. तिने अत्यंत धैयनि या आजाराशी लढा दिला. न्यूयॉर्क येथे उपचार घेत असताना ती तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत राहिली. पन्नाशी पार केली असली तरी तिचे सौंदर्य अजूनही प्रेमात पाडणारे आहे. नुकतेच तिने काळ्या ड्रेसमध्ये केलेले फोटो शूट याची साक्ष देते आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.