रविनाच्या लेकाच्या बॉलीवूड पदार्पणासाठी चाहते उत्सुक

 रविनाच्या लेकाच्या बॉलीवूड पदार्पणासाठी चाहते उत्सुक


रवीना टंडन ही ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री एक काळ असा होता की, त्यावेळी रवीना हिच्या सौंदर्यासोबत अभिनयाची सर्वत्र चर्चा रंगली होती. सध्या रवीना बॉलीवूडपासून दूर असली तरी नेहमीच चर्चेत असते. रवीनाप्रमाणेच लेक राशा थडानी हिने बॉलीवूड पदार्पण केले आहे. आता राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तर रविनाचा मुलगा रणबीर लाईमलाईटपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. तो दिसयालाही देखणा आहे. रणबीर आता १७ वर्षांचा झाला आहे. 

सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. रणबीर हा आई रवीनापेक्षाही उंच दिसतो. राशानंतर रणबीरच्या बॉलीवूड पदार्पणाच्या प्रतीक्षेत चाहते आहे. रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केले आहे. रवीना ही अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे. दोघांना राशा आणि रणबीर ही दोन मुले आहेत. आता रणबीरचे व्यक्तीमत्त्व पाहून त्याने बॉलीवूड पदार्पण करावे, असे रविनाच्या चाहत्यांना वाटत आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.