जगातील सर्वात महागडी घड्याळे......
वेळ अमूल्य असते, पण काही घड्याळं मात्र इतकी अमूल्य असतात की, त्यांच्या किमती ऐकून श्वास रोखून धरावा लागतो. ही घड्याळे राजेशाही परंपरा, तांत्रिक पराकष्ठा आणि अब्जाधीशांच्या संग्रहातील शान दर्शवतात. काही अमूल्य घड्याळांची ही माहिती...
ग्राफ डायमंडस् हॅलुसिनेशन
ग्राफ डायमंडस् द फॅसिनेशन
या घड्याळाची किंमत ५० दशलक्ष डॉलर एवढी असून, जगातील दुसरे सर्वात महागडे घड्याळ आहे. हे घड्याळ १५२.९६ कॅरेट हिऱ्यांनी जडवलेले ब्रेसलेट घड्याळ आहे. या घड्याळाच्या मध्यभागी ३८.१४ कॅरेट वजनाचा हिरा असून, त्याभोवतीही लहान हिऱ्यांची आरास आहे.
पाटेक फिलिप ग्रँडमास्टर चाईम या घड्याळात २०
कॉम्प्लिकेशन्स एक रिव्हर्सिबल केस, दोन स्वतंत्र डायल आणि सहा पेटंटेड नवोन्मेष आहेत. या घड्याळाची किंमत ३१ दशलक्ष म्हणजे सुमारे २६९ कोटी रुपये इतकी आहे. घड्याळाला त्याच्या ड्युअल-डायल डिझाईनमुळे वेगळेपण येते, ज्यामध्ये निळ्या ओपलाईन रंगाची पार्श्वभूमी, सोनेरी अंक आणि १८ कॅरेट सॉलिड गोल्ड डायल प्लेटस् आहेत.
ब्रेगेट ग्रांडे कॉम्प्लिकेशन मेरी अँटोइनेट
या घड्याळाची किंमत सुमारे २६१ कोटी रुपये एवढी आहे. प्रसिद्ध घड्याळ निर्माता अब्राहम ब्रेगेट यांनी डिझाइन केले असून, ते पूर्ण होण्यासाठी तब्बल ४० वर्षे लागली. या घड्याळात एक शाश्वत कॅलेंडर, थर्मामीटर आणि इतर प्रगत रचना आहेत. सध्या हे जेरुसलेममधील एलए मेयर संग्रहालयात प्रदर्शनासाठी आहे.
जेगर-लेकौल्ट्रे जोएलेरी १०१ मॅन्चेट
या घड्याळाची किंमत सुमारे २२६ कोटी एवढी आहे. हे घड्याळ पांढऱ्या सोन्याने बनवलेले असून, घड्याळात टूरबिनल कॉम्प्लिकेशन बसवले आहे. याचे एक वैशिष्ट्य त्याच्या ठेवण प्रकाराला अनोखे सौंदर्य प्रदान करते. कारण, ते एकूण ५७७ हिऱ्यांनी जडलेले आहे.
चोपार्ड २०१-कॅरेट घड्याळ
या घड्याळाची किंमत २५ दशलक्ष डॉलर असून, यामध्ये विविध रंग आणि आकाराचे ८७४ उच्च दर्जाचे हिरे आहेत. या घड्याळातील स्प्रिंग-लोडेड यंत्रणा दाबल्यानंतर तीन हृदयाच्या आकाराचे दगड सूर्याच्या संपर्कात असलेल्या फुलांच्या पाकळ्यांसारखे उघडतात. हे घड्याळ एकूण २०१ कॅरेट वजनाचे आहे.


Post a Comment