ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेले नाही : पंतप्रधान

 प. बंगालच्या भूमीवरून पाकिस्तानला खणखणीत इशारा दिलेला आहे

मोदी म्हणाले...

भारताने पाकिस्तानला घरात घुसून तीनवेळा दणका दिला

नव्याने दहशतवादी हल्ला झाला, तर पुरेपूर किंमत मोजावी लागेल

दहशतवाद पोसणाऱ्यांना सैन्याने सिंदूरशक्तीची जाणीव करून दिली

पाकिस्तानने हे समजून घ्यावे की, आम्ही तीनवेळा त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेले नाही. आता जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर शत्रूला त्याची पुरेपूर किंमत चुकवावी लागेल, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला दिला. पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे गुरुवारी पंतप्रधानांनी जाहीर सभेला संबोधित केले.आपल्या भाषणात त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर', पाकिस्तान, ममता बॅनर्जी सरकारचा भ्रष्टाचार आणि केंद्राच्या धोरणांचा उल्लेख केला.

पंतप्रधान म्हणाले की, बंगालच्या भूमीवरून १४० कोटी भारतीयांच्या वतीने मी घोषणा करतो की, 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेले नाही.आज मी सिंदूरच्या या भूमीवर आलो असल्याने दहशतवादाबाबत भारताच्या नवीन संकल्पावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देशासह पश्चिम बंगालमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना आणि तो पोसणाऱ्यांना सिंदूरशक्तीची जाणीव करून दिली.

सैन्य दलाचा असामान्य पराक्रम

पाकिस्तानने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशा ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डेड्डे भारतीय सैन्याने असामान्य पराक्रम दाखवून उद्ध्वस्त केले. दहशतवाद पाळणाऱ्या पाकिस्तानकडे जगाला देण्यासाठी काहीही सकारात्मक नाही. अस्तित्वात आल्यापासून त्यांनी जगभरात दहशत निर्माण केली, असे मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान म्हणाले की, १९४७मध्ये फाळणी झाल्यापासून दहशतवादी भारतावर हल्ले करीत आहेत. बांगला देशमध्ये पाकिस्तानी सैन्याने बलात्कार करून हजारो महिलांची हत्या केली. दहशतवाद आणि नरसंहार हे पाकिस्तानचे मनसुबे आहेत. थेट लढाईत तो देश नेहमीच मार खात आला आहे. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांचा पाठिंबा घेत आले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. यापुढे जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर शत्रूला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल.

तृणमूलच्या लोकांना हवगरिबांकडूनही कमिशनपश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार देशभरातील गरिबांना काँक्रीटची घरे देत आहे. येथे लाखो कुटुंबांसाठी घरे बांधली जात नाहीत. कारण, तृणमूलचे लोक यातही गरिबांकडून कमिशनची मागणी करत आहेत. पश्चिम बंगालला आता हिंसाचार, दंगली, महिलांवरील अत्याचार आणि घोटाळ्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणापासून मुक्तता हवी आहे


No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.