शैतान' मधील त्या सीनने माधवनला अस्वस्थ केले...

 शैतान' मधील त्या सीनने माधवनला अस्वस्थ केले


सिंघम अजय देवगण आणि आर. माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला 'शैतान' हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजयपेक्षा खलनायक साकारणारा माधवन याने अभिनयाने सर्वांची मने जिंकली. आता याच चित्रपटातील काही सीन्स करताना माधवन खूपच अस्वस्थ झाला होता. याबाबतचा खुलासा स्वतः त्यानेच केला आहे. एका मुलाखतीत माधवन म्हणाला की, 'शैतान' या चित्रपटातील एक सीन खूपच अस्वस्थ करणारा होता, यामध्ये अजयच्या ऑनस्क्रीन मुलीला रात्रभर नाचण्यास मी भाग पाडतो. ते खूप संवेदनशील दृश्य होते. 

एक क्षण असा येतो की त्या मी जानकीला रात्रभर नाचायला सांगतो. यावेळी थकल्याने तेथे ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. वास्तविक मूळ सीन्स थोडे वेगळे होते, पण तेथे मला जाणवले की खलनायक म्हणूनही , मी त्या क्षणी त्याकडे भावनिकदृष्ट्या पाहिले असते तर सीन हवा तसा होणार नाही. त्यामुळे तो सीन पाहताना प्रेक्षकांना किळस वाटावी, अशी माझी इच्छा होती. त्यामध्ये दया वाटावी अशी दृश्ये असू नयेत. त्या सीनदरम्यान मी स्वतःच्या अंगावर चादर ओढून घेतली होती. एक अभिनेता म्हणून मला काम केल्याचे समाधान मिळाले आहे

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.