कल्की-२ मधून दीपिका बाहेर होण्याची शक्यता ?
कल्की-२ मधून दीपिका बाहेर होण्याची शक्यता
हिंदी कलाविश्वात सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. आई झाल्यानंतर दीपिकाने आता ८ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर वांगा यांनी विरोध करत तिला 'स्पिरिट' या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविला. यावरून बॉलीवूडमधील अनेकांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे आता दीपिकाला 'कल्की- २' या चित्रपटातूनही आऊट केल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दीपिकाची भूमिका कमी करण्याचा अथवा थेट हटवण्याचाच विचार केला असल्याचे बोलले जात आहे.
कमी तासांची शिफ्टच्या मागणीमुळे 'कल्की- २' या चित्रपटाचे निमति दीपिकाला हटवण्याच्या विचारात आहे. या चित्रपटात दीपिकासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास प्रमुख भूमिकेत होता. 'कल्की' या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या चित्रीकरणावेळी दीपिका ही प्रेग्नंट होती. तरी तिने चित्रीकरण पूर्ण केले होते. मात्र आता तिच्या मागण्यांच्या निणर्यामुळे दीपिकाला 'कल्की- २' या चित्रपटातून बाहेर काढण्याचा विचार करत आहेत, पण याबाबत संदर्भात अधिकृत अशी काहीच माहिती समोर आलेली नाही.
Post a Comment