बँक मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी काढले..

 बँक मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी काढले


शेअर बाजारात पैसे बुडाले; मोबाइल नंबर बदलले

कोटा : येथील आयसीआयसीआय बँकेची महिला रिलेशनशिप मॅनेजर साक्षी गुप्ता हिने ग्राहकांच्या खात्यातून ४ कोटी ५८ लाख रुपये परस्पर काढत शेअर बाजारात गुंतवले. तिने कुटुंबीयांच्या खात्यांतूनही ४० ते ५० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले. मात्र हे सर्व पैसे आता बुडाले आहेत. तिला अटक करण्यात आली आहे. तिने २०२० ते २०२३ या काळात ४१ ग्राहकांच्या ११० हून अधिक खात्यांमधून पैसे काढत शेअर बाजारात गुंतवले. (वृत्तसंस्था)

घोटाळा समोर कसा आला?

बँकेच्या एका ज्येष्ठ महिला ग्राहकाच्या खात्यातून ३ कोटी २२ लाख रुपये काढण्यात आले. ती तक्रार करण्यासाठी बँकेतही आली. यानंतर हे प्रकरण समोर आले. साक्षी ग्राहकाच्या खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करत असे. तिने त्या खात्याचा वापर पूल अकाउंट म्हणून केला होता.

असा केला घोटाळा

साक्षीने ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलले. त्यामुळे ओटीपी आले नाहीत. तीने फिक्स डिपॉझिटसमध्ये फेरफार करून हा घोटाळा केला. तिने एका व्यक्त्तीच्या नावावर ३.४ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि एटीएम, इंटरनेट बँकिंग, तसेच चार ग्राहकांचे डेबिट कार्ड वापरून व्यवहार केले.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.