तब्बल १७ अब्ज रुपयांचे घर....

तब्बल १७ अब्ज रुपयांचे घर


वॉशिंग्टन :चष्मा बनवणारी कंपनी ओकलेचे संस्थापक जेम्स जेनार्ड यांनी कॅलिफोर्नियामधील मालिबु येथे असलेले त्यांचे आलिशान घर विकले आहे. या घराची किंमत २१० मिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास १७ अब्ज रुपये) आहे. कॅलिफोर्नियामधील सर्वात महागड्या घरांपैकी हे एक घर आहे. खरेदीदाराची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

डेलावेयर येथील एका कंपनीने हे घर खरेदी केले आहे. जेम्स जेनार्ड यांनी २०१२ मध्ये हे घर हॉवर्ड मार्क्स यांच्याकडून ७५ मिलियन डॉलरला (जवळपास ६ अब्ज रुपये) खरेदी केले होते. हॉवर्ड मार्क्स यांनी २००२ मध्ये हर्बालाइफचे सह-संस्थापक मार्क ह्यूजेस यांच्याकडून ३१ मिलियन डॉलरला (जवळपास २.५ अब्ज रुपये) ते खरेदी केले होते. १५,००० स्क्वेअर फूटमध्ये (१,४०० स्क्वेअर मीटर)

असलेले हे घर ९.५ एकरमध्ये (४ हेक्टर) पसरलेले आहे. या घराला स्वतःचा ३०० फूट लांब समुद्रकिनारा आहे. घरामध्ये आठ बेडरूम, १४ बाथरूम, मोठे आवार, जिम आणि दोन गेस्ट हाऊस आहेत. लॉस एंजेलिसपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर असलेले मालिबु हे प्रसिद्ध बीच एन्क्लेव आहे. हे सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोकांचे आवडते ठिकाण आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि सर्वात श्रीमंत राज्य आहे. तेथील या आलिशान घराची किंमत आता सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.