भारत पहिले ध्रुवीय संशोधन जहाज तयार करणार
भारत पहिले ध्रुवीय संशोधन जहाज तयार करणार जीआरएसई ने नॉर्वेच्या काँग्सबर्ग सोबत केला सामंजस्य करार
नवी दिल्ली, दि. ३ केंद्रीय चंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत आज कोलकाता येथील गार्डन रोच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) आणि नॉर्वेच्या काँम्सबर्ग यांच्यात एका महत्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या सामंजस्य करारामुळे भारतासाठी स्वदेशी पद्धतीने पहिले घुबोय संशोधन जहाज बांधण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
हे जहाज अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज असेल, ज्यामुळे आपल्या संशोधकांना महासागरांच्या खोलात जाऊन शोध घेता येईल, सागरी परिसंस्थांचा अभ्यास करता येईल आणि
आपल्या ग्रहाच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल नवीन माहिती उलगडता येईल. भारताच्या महत्त्वपूर्ण जहाजबांधणी क्षमतेचा हा दाखला असेल, असे सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितले. ध्रुवीय संशोधन जहाज
विकसित करण्यासाठी त्यांना राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन डिझाइन संबंधी तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. युद्धनौका, सर्वेक्षण आणि संशोधन जहाजे यांसारखे जटिल सागरी प्लॅटफॉर्म बांधण्याचा समृद्ध अनुभव असलेले जीआरएसई कोलकाता येथील त्यांच्या यार्ड मध्ये या जहाजाची बांधणी करेल, या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांसह कोंग्सबर्ग तसेच जीआरएसईचे प्रमुख अधिकारी, नॉर्वे आणि भारतातील बरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनो भविष्य घडवण्यात जहाजबांधणीची भूमिका या विषयावरील उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले.
.jpg)
Post a Comment