हेराफेरी-३' मध्ये परेश रावलच हवेत
हेराफेरी-३' मध्ये परेश रावलच हवेत
यानंतर 'हेराफेरी-३' चित्रपटातील अन्य कलाकार अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाची यावर प्रतिक्रिया समोर आली आहे. खरे तर काही दिवसांपूर्वी हिमेशचा मुंबईत एक संगीत कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हिमेशने परेश यांचे नाव न घेता त्यांच्या चित्रपटातून बाहेर पडण्यावरून भाष्य केले. तो म्हणाला की, पहिल्या 'हेराफेरी या चित्रपटात त्यांनी अप्रतिम अभिनय केला होता आणि 'हेराफेरी २' या चित्रपटातही त्याचे प्रत्यंतर आले.
आता ते पुन्हा एकदा ग्रेट होतील. 'हेराफेरी-३' या चित्रपटात परेश यांच्याशिवाय मजा येणार नाही. यावेळी हिमेशने स्टेजवर जुम्मे रात! हे गाणेही गायले. हिमेशचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. हिमेशने 'फिर हेरा फेरी' या चित्रपटाला संगीत दिले होते आणि ते लोकांना आवडले होते. तसेच त्याने पहिल्या 'हेराफेरी' चित्रपटात एक गाणेही गायले आहे

Post a Comment