फळ पीकविमा योजनेसाठी फार्मर आयडी आवश्यक

अॅग्रिस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र हवे; कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांचे आवाहन

पुनर्रचित हवामानाधारित फळ पीकविमा योजनेची अंमलबजावणी

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) हा दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. तद्वषंगाने पुनर्रचित हवामानाधारित फळ पीकविमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये योजनेत सहभागी होण्याकरिता अॅग्रिस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे. तरी शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तत्काळ काढून घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी केले आहे.

पुनर्रचित हवामानाधारित फळ पीकविमा योजना दिनांक १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग व आंबिया बहारामध्ये अधिसूचित फळ पिकांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यात येत आहे.

मृग बहार सन २०२५ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, चिकू, पेरू, सीताफळ व लिंबू या ८ फळ पिकांसाठी २६ जिल्ह्यांमध्ये; तर आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी या ९ फळ पिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये फळ पिकांच्या हवामान घोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

दि. ११ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच दि. १५ मे २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) हा दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. तद्वषंगाने पुनर्रचित हवामानाधारित फळ पीकविमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये सदर योजनेत सहभागी होण्याकरिता अॅग्रिस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तत्काळ काढून घेण्याकरिता सूचित करण्यात येत आहे. दि. ११ एप्रिल २०२५ रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https:///www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.