किसिंग सीनमुळे पद्मिनीने नाकारला होता 'राम तेरी गंगा मैली'
किसिंग सीनमुळे पद्मिनीने नाकारला होता 'राम तेरी गंगा मैली'
90च्या जमान्यात 'राम तेरी गंगा मैली' हा सिनेमा पाहिला नाही, असा सिनेरसिक ९९ विरळाच. श्रवणीय गाणी, हिमालयातील सिनेमॅटोग्राफी आणि बोल्ड सीन यामुळे या सिनेमातून मंदाकिनी रातोरात स्टार बनली. पण तुम्हाला माहिती आहे का?
सिनेमातील गंगाचा रोल आधी पद्मिनी कोल्हापुरेला ऑफर करण्यात आला होता. पण त्यातील किसिंग सीनमुळे पद्मिनीने राज कपूर यांना 'अंकल, मी हे करू शकत नाही', असे तोंडावर सांगितले होते. १९८५ मध्ये राज कपूर यांनी राम तेरी गंगा मैली हा चित्रपट बनवला. चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर यशाचे झेंडे फडकवले. मात्र या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे प्रेक्षक चकित झाले. अनेकांना डोळे झाकावे लागले, इतके बोल्ड सीन चित्रपटात होते. त्यामुळे चित्रपटावर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. पण मंदाकिनीला या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका रात्रीत ती स्टार बनली. मात्र या भूमिकेसाठी राज कपूर यांची पहिली पसंती मंदाकिनी नव्हती, ते ही भूमिका पद्मिनी कोल्हापुरी यांना देऊ इच्छित होते. पद्मिनी कोल्हापुरी आणि राज कपूर यांच्यात अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळे राज कपूर यांना वाटले की, पद्मिनी या चित्रपटासाठी नकार देणार नाही. जेव्हा त्यांनी
चित्रपटाबद्दल सांगितले आणि किसिंग सीनचा उल्लेख केला, तेव्हा पद्मिनीने नकार दिला. राजश्री अनप्लग्ड या कार्यक्रमात दिलेल्या एका मुलाखतीत पद्मिनीने स्वतः याचे खुलासे केले. तिने सांगितले की, जेव्हा राज अंकल यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितले, तेव्हा त्यात एक किसिंग सीन होता. मी कधीच असे रोल केले नव्हते. त्यामुळे मला तो सीन करायचा नव्हता. राजीव कपूरसोबत काम करण्यात मला काही अडचण नव्हती. पण किस करणे मला योग्य वाटत नव्हते. म्हणून मी तो चित्रपट नाकारला. चित्रपटाचे ४५ दिवसांचे शूटिंग
झाल्यानंतरही राजजी म्हणाले की, अजूनही तू या चित्रपटात काम करू शकतेस. पण मी स्पष्ट सांगितले, अंकल, मला माफ करा, मी हे करू शकत नाही

Post a Comment