महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 'गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ एक जूनला होणार 'गट क' परीक्षा
एक जूनला होणार 'गट क' परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 'गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची हॉल तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या रविवारी, एक जूनला राज्यभरात ही परीक्षा होणार असून, परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास परीक्षा कक्षातील बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने 'एमपीएससी'ने स्पष्ट केले.
'एमपीएससी' मार्फत नुकतीच या परीक्षेसाठी प्रवेशपत्रांची घोषणा केली आहे. आयोगाच्या वेबसाईटवर प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यत आली आहेत. वेबसाइटवरून डाउनलोड केलेल्या हॉल तिकिटांची प्रिंट उमेदवारांना परीक्षेला घेऊन जावी लागणार आहे. त्यासोबत ओरिजिनल
ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी या बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास परीक्षा केंद्रावर व एक तास आधी बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे 'एमपीएससी' ने स्पष्ट केले आहे.
... येथे साधा संपर्क
हॉल तिकिटे डाऊनलोड करण्यात काही अडचण आल्यास, 'एमपीएससी' ने ईमेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. contact secretary@mpsc.gov.in व support-online
mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येणार आहे.
Post a Comment