अमेरिकेपेक्षाही अधिक चांदी जगातील कोणत्या देशांकडे?
पेरू हा जगातील सर्वाधिक चांदीचा साठा असलेला देश आहे
ज्याच्याकडे एकूण १,४०,००० मेट्रिक टन इतकी चांदी आहे, २०२४मधील आकडेवारीनुसार ही बाब समोर आली आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया आणि रशिया हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चीन आणि पोलंडकडे हेदेखील चांदीचा साठा असलेले महत्त्वाचे देश आहेत. भारताजवळ असलेला चांदीचा साठा ८,००० मेट्रिक टन असून, तो यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. उद्योगांमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये तसेच गुंतवणुकीसाठी चांदी हा धातू महत्त्वाचा मानला जातो.
देशांतील चांदीचा साठा मेट्रिक टनमध्ये...
पेरू - १,४०,०००
ऑस्ट्रेलिया - ९४,०००
रशिया - ९२,०००
चीन - ७०,०००
पोलंड - ६१,०००
मेक्सिको - ३७,०००
चिली - २६,०००
अमेरिका - २३,०००
बोलिव्हिया - २२,०००
भारत - ८,०००
अर्जेंटिना - ६,५००
कॅनडा - ४,९००

Post a Comment