आई वरील कविता...
आई
लिहण्या तुला बसलो शब्द
ही पडले अपुरे,
जगणे माझे आई आहे
तुझ्याचमुळे सारे.
घेतल्या प्रत्येक वीसाचा
ऋणी मी तुझा,
तुच आहेस जगण्याचा आधार
माझा.
कितीही फिरलो जगात बाहेर
जरी,
प्रवास माझा येवुन थांबे
तुझ्याच मांडीवरी.
लाख विसावे शोधून मी
पाहीले,
नाही कुठेच तुझ्या
पदरासारखे छत्र गवसले.
आजवर कधी न तू राग माझा
केला,
तुझ्याच शब्दाने मिळते
ताकद मला.
मायेचा हात तुझा
डोक्यावरून जेव्हा फिरतो,
संकटात लढण्याचे बळ मला
देऊन जातो.
सांग तुझ्यासारखे प्रेम
कसे करावे,
तुझ्यावाचून हे जीवन
व्यर्थ सारे.
सोबत कायम तुझी अशीच
रहावी,
जन्मोजन्मी या लेकराची
तूच आई व्हावी.
Post a Comment