आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना थांबवा...
तुलना
एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो.
एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला
वाटते "हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही???"
तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील. पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते
तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही.
मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो," तू किती सुंदर आहेस आणि
नशीबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला.
तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, "मला तर वाटते सगळ्यात
नशीबवान तूच आहेस. फक्त तू असा आहेस की
कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेऊ शकत नाहीस, तू स्वतंत्र आहेस." हे ऐकून कावळ्याला कळते तो किती नशीबवान आहे ते.
असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं. ५ लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्र
मैत्रीण १२ लाख कमावतो त्याच वाईट वाटतं. १२ लाख कमावणाऱ्या व्यक्तीला २४ लाख कमावणाऱ्या
व्यक्तीविषयी असूया असते आणि तो २४ लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो
पैसा तर खूप मिळतोय पण शरीर साथ देत नाही यापेक्षा ४ कष्टाची कामं केली असती, पैसा कमी कमावला असता तर
शरीर चांगल असतं. ही समाजात घडणारी सत्य
परिस्थिती आहे.
एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो, माझा नाही. पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या
पत्नीला वेळ देऊ शकत नसेल.
कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट
वाटते. पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक
त्याला वाटत नसावं.
मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला
स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं पण आजारपणात आपला मुलगा एका हाके सरशी
आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधी करतच नसावी.
तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अती तणावाखाली जगतात.
थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आल होत की
तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही
आम्ही शाळेतून त्याच नाव कमी करत आहोत.
जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर
मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडली असती तर ते एवढे महान
झाले नसते.
जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्की असतं. ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही. पण जे मिळालंय त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न
आपण नक्की करू शकतो.
इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास
होत असतो.
आपण दिसायला सुंदर नसू पण आपल हस्ताक्षर सुंदर असेल.
आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू.
आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल.
आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात
असू.
जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे
मला का मिळालंय? यातून मी काय उत्तम करू
शकतो याचा विचार करा.
तुलना थांबवा.
तुलना थांबवा...
Post a Comment