चंद्रावरील 'केशरी मोत्यां' चे रहस्य उलगडले ३ अब्ज वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीचा पुरावा
चंद्रावरील 'केशरी मोत्यां' चे रहस्य उलगडले ३ अब्ज वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीचा पुरावा
जेव्हा 'अपोलो' मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना तिथे राखाडी खडक आणि धूळ आढळेल, अशी अपेक्षा होती; पण त्यांना जे सापडले ते आश्चर्यकारक होते, चंद्राच्या भूभागावर विखुरलेले सूक्ष्म, चमकदार केशरी काचेचे मणी, जे एखाद्या जादुई रत्नासारखे दिसत होते. वाळूच्या कणापेक्षाही लहान असलेले हे मणी म्हणजे कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीने सक्रिय असलेल्या चंद्राच्या इतिहासाचे प्राचीन साक्षीदार आहेत. हे मणी सुमारे ३.३ ते ३.६ अब्ज वर्षांपूर्वी, चंद्राच्या तरुणपणी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमधून तयार झाले होते.
या काचेच्या मण्यांची कहाणी चंद्रावरील भव्य अशा ज्वालामुखीच्या उद्रेकांपासून सुरू होते. जेव्हा चंद्रावरील ज्वालामुखींनी आतील पदार्थ पृष्ठभागावर फेकले, तेव्हा लाव्हारसाचा प्रत्येक थेंब चंद्राभोवतीच्या थंड वातावरणात त्वरित घट्ट झाला आणि हे मणी तयार झाले. याची कल्पना वाईच्या प्रसिद्ध लावा फवाऱ्यांप्रमाणे करता येईल; पण हे सर्व शून्यवत वातावरणात घडले. वातावरणाचा अभाव आणि हवामानाचा कोणताही परिणाम नसल्यामुळे, हे सूक्ष्म काचेचे गोल तीन अब्ज वर्षांहून अधिक काळ जसेच्या तसे राहिले आहेत. पन्नास वर्षांपासून हे नमुने प्रयोगशाळांमध्ये पडून होते, वैज्ञानिकांची उत्सुकता तंत्रज्ञानाच्या प्रगतीची वाट पाहत होती.
आता, अपोलो युगात अस्तित्वात नसलेल्या प्रगत सूक्ष्मदर्शकीय तंत्रांचा वापर करून संशोधकांना अखेर या मण्यांच्या आत डोकावता आले आहे. संशोधन पथकाने या मण्यांचे नुकसान न करता त्यांचे विश्लेषण करण्यासाठी उच्च ऊर्जा आयन बीम आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीसारख्या अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर केला. पृथ्वीच्या वातावरणापासून या नमुन्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना अत्यंत काळजी घ्यावी लागली; कारण पृथ्वीचे वातावरण त्यांच्या पृष्ठभागावरील प्राचीन खनिजांमध्ये बदल घडवू शकले असते. या मण्यांना वैज्ञानिकदृष्ट्या इतके मौल्यवान बनवणारी गोष्ट म्हणजे ते वेगवेगळ्या रंगात आणि रचनांमध्ये आढळतात, जे चंद्राच्याज्वालामुखीच्या इतिहासातील विविध अध्यायांची माहिती देतात.
काही मणी चमकदार केशरी आहेत, तर काही चकचकीत काळे आहेत आणि प्रत्येक प्रकार लाखो वर्षांमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या उद्रेकांची माहिती उघड करतो. मण्यांच्या पृष्ठभागावरील खनिजे आणि आयसोटोपिक कम्पोझिशन ३.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या चंद्रावरील उद्रेकांच्या वेळचा दाब, तापमान आणि रासायनिक वातावरणाची माहिती देतात. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, ज्वालामुखीच्या क्रियाकलापांची शैली कालांतराने बदलली, ज्यामुळे चंद्राचे अंतरंग कसे विकसित झाले, याबद्दल मौल्यवान माहिती मिळाली.
ओग्लिओर यांनी काव्यात्मक भाषेत वर्णन केल्याप्रमाणे, या मण्यांचे विश्लेषण करणे म्हणजे 'एका प्राचीन चंद्र ज्वालामुखीशास्त्रज्ञाची रोजनिशी वाचण्यासारखे आहे.' प्रत्येक लहान गोल चंद्राच्या आत खोलवर असलेल्या परिस्थितीबद्दल संकेत देतो, जेव्हा आपली सूर्यमाला अजूनही तरुण आणि गतिशील होती.
Post a Comment