मोनालिसा : महाकुंभमेळा ते पहिले गाणे 'सादगी'

मोनालिसा : महाकुंभमेळा ते पहिले गाणे 'सादगी'


प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मोनालिसा भोसले आता एक स्टार बनली आहे. या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून चर्चेत असलेली मोनालिसा लवकरच चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

तत्पूर्वी, तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी, व्हायरल गर्ल मोनालिसाचे एका म्युझिक अल्बममधील पहिले गाणे 'सादगी' प्रदर्शित झाले आहे, ज्याद्वारे तिने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मोनालिसाचा पहिला म्युझिक व्हिडीओ 'सादगी' उत्कर्ष सिंहसोबत प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये मोनालिसा पांढऱ्या लेहंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. आपल्या

टपोऱ्या, पिवळसर डोळ्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाच्या या डोळ्यांवरही गाण्यात 'फोकस' केलेला दिसतो. गाण्याचे बोलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत, तसेच, मोनालिसा आणि उत्कर्ष सिंह यांच्यातील केमिस्ट्रीही अप्रतिम दिसत

आहे. व्हायरल गर्ल मोनालिसाचा पहिला म्युझिक व्हिडीओ समोर येताच प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. एका यूजरने लिहिले की, 'मोना तर आहेच क्यूट.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'खूप सुदर, भाग्यवान मुलगी.' आणखी एका यूजरने म्हटले की, 'म्हणूनच तिचे नाव मोनालिसा आहे, ज्या दृष्टिकोनातून पाहाल तशी दिसेल. अप्रतिम गाणे.' रीलिज होताच काही वेळातच हे गाणे हजारो लोकांनी पाहिले. याच वर्षी २०२५ मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यादरम्यान माळा विकणारी एक मुलगी व्हायरल झाली होती, जिच्या डोळ्यांनी सर्वांना वेड लावले होते. ती मुलगी दुसरी कोणी नसून मोनालिसा होती, जिला काही काळानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी चित्रपटांमध्ये कास्ट करण्याची घोषणा केली होती. याच कारणामुळे मोनालिसा रातोरात स्टार बनली. आता तिने अभिनयाच्या जगतात पदार्पण केले आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.