दर पाच मिनिटांनी सरकार घेतंय मोबाईलचा स्क्रीनशॉट

दर पाच मिनिटांनी सरकार घेतंय मोबाईलचा स्क्रीनशॉट  


सध्या जगात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच हुकूमशाही असलेले देश आहेत. याच देशांपैकी एक म्हणजे उत्तर कोरिया। या देशातील हुकूमशाह किम जोंग उनच्या करामतींमुळे तो जगभरामध्ये (कु) प्रसिद्ध आहे. आता किम जोंग उनचा असाच एक नवा कारनामा बाहेर आला आहे. उत्तर कोरियामधील जनतेचे स्मार्ट फोन आता सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत असल्याचे 'बीबीसी'ने अगदी पुराव्यासहीत जगासमोर आणले आहे. तेथील सरकार दर पाच मिनिटांनी नागरिकांच्या मोबाईलचा स्क्रिनशॉट घेत आहे. या नव्या नियमामुळे उत्तर कोरियामधील लोकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती प्राप्त करता येत नाही किंवा स्वतःच्या स्मार्ट फोनचा खासगी वापर करता येत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

देशातील सर्व फोनमध्ये फेरफार उत्तर कोरियातील दैनंदिन जीवन आणि प्रत्येक माहितीसंदर्भात फार काटेकोर सेन्सॉरशिप लावली जाते. त्यामुळेच बीबीसीने तस्करीच्या माध्यमातून उत्तर कोरियातील स्मार्ट फोन मिळवला आणि त्याची तपासणी केली. या स्मार्ट फोनमधील अँड्रॉईडचे कस्टमाईज व्हर्जन वापरले जाते. त्यामुळे या फोनमध्ये फक्त स्थानिक इंटरनेटशीच फोन कनेक्ट होतो. या इंटरनेटच्या माध्यमातून उत्तर कोरिया सरकारला जी आणि जेवढी माहिती दाखवायची आहे, तीच यूझर्सला पुरविली जाते. सदर स्मार्ट फोनचे विश्लेषण करताना एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, या स्मार्ट फोनद्वारे गुप्तपणे दर पाच मिनिटांनी स्क्रिनशॉट घेतला जातो. 

हे स्क्रिनशॉट एका गुप्त फोल्डरमध्ये सेव्ह केले जातात. फोनच्या यूझरला हे स्क्रीनशॉट दिसत नाहीत; मात्र सरकारी यंत्रणा हे स्क्रीनशॉट पाहू शकतात. स्मार्ट फोनशी छेडछाड झाली किंवा बाहेरच्या देशातील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, तर तो गुन्हा मानला जाईल, असे सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे.

एवढेच नाही, तर एखाद्याला फोनवर काही संदेश टाईप करायचा असेल, तर सरकारला जी भाषा अपेक्षित आहे, ती आपोआप रेकमेंड केली जाते. उदाहरणार्थ, उत्तर कोरियामधील स्मार्ट फोनवर एखाद्याने कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण कोरिया या देशाचे नाव टाईप केले, तर तो शब्द आपोआप उत्तर कोरियाच्या अजेंड्यानुसार 'पपेट स्टेट' (कळसूत्री बाहुली देश) असा होतो. उत्तर कोरिया सरकारने अधिकृतपणे शेजारच्या राष्ट्रासाठी हाच शब्द वापरण्याची भूमिका घेतली असून ती या स्मार्ट फोनच्या माध्यमातूनही राबवली जाते.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.