२३०० फूट खोल समुद्रात सापडले १. २० लाख वर्षापूर्वी हरवलेले पृथ्वीवरील सर्वात मोठे शहर

 २३०० फूट खोल समुद्रात सापडले १. २० लाख वर्षापूर्वी हरवलेले पृथ्वीवरील सर्वात मोठे शहर


२३०० फूट खोल समुद्रात सापडले १,२०,००० वर्षांपूर्वी हरवलेले पृथ्वीवरील सर्वात मोठे शहर सापडले आहे. पृथ्वीवरील हे आजपर्यंतचे सर्वात मोठे संशोधन मानले जात आहे. अटलांटिक महासागरात सापडलेले हे शहर जीवसृष्टीची अनेक रहस्य उलगडणार आहे. कारण जिथे हे शहर सापडले आहे तिथे अनेक दुर्मीळ जीवदेखील आढळून आले आहेत.

अटलांटिक महासागरात हे लुप्त झालेले शहर सापडले आहे. मध्य-अटलांटिक रिजजवळ एक पर्वत आहे, जिथे लॉस्ट सिटी हायड्रोथर्मल फील्ड नावाचे एक अद्वितीय ठिकाण सापडले आहे. येथे उंच चुनखडीच्या चिमण्या आहेत, ज्या निळ्या प्रकाशात चमकतात. पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात येण्याबाबतची अनेक रहस्य उलगडण्यास हे शहर दिशादर्शक ठरू शकते.

सर्वप्रथम २००० मध्ये शास्त्रज्ञांना समुद्राच्या पृष्ठभागापासून ७०० मीटर खाली हरवलेले शहर सापडले. हे महासागरातील सर्वात जुन्या जलऔष्णिक व्हेंटस्चे ठिकाण मानले जाते. जे किमान १२०,००० वर्षापासून सक्रिय आहेत. येथील चिमणी ६० मीटरपर्यंत उंच आहेत. लहान मशरूमसारख्या रचनादेखील आहेत. पोसायडॉनसारख्या समुद्री देवतांच्या नावावरून त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत.

या लॉस्ट सिटीमध्ये, समुद्राचे पाणी आणि पृथ्वीचा आवरण थर एकत्रित होऊन हायड्रोजन, मिथेन आणि इतर वायू तयार होतात. ऑक्सिजन नसतानाही सूक्ष्मजीव अर्थात जीवाणू यांचे अस्तित्व येथे पाहायला मिळते. लहान गोगलगाय, खेकडे, कोळंबी आणि समुद्री अर्चिनसारखे जीव येथे पाहायला मिळतात.

पृथ्वीवरील जीवनाच्या सुरुवातीचे संकेत येथे मिळू शकतात, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. येथील चिमणी जीवनासाठी आवश्यक असलेले हायड्रोकार्बन तयार करतात. हे हायड्रोकार्बन सूर्यप्रकाश किंवा कार्बन डाय ऑक्साईडपासून तयार होत नाहीत, तर समुद्राच्या तळाशी होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमधून तयार होतात.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.