पृथ्वीपलीकडे सापडला नवा ग्रह !

 पृथ्वीपलीकडे सापडला नवा ग्रह !

शास्त्रज्ञांनी अखेर पृथ्वीच्या पलीकडे एक अत्यंत रंजक आणि गूढ असा नववा ग्रह शोधून काढला आहे. प्लूटोच्या बाहेरील या नव्या ग्रहाच्या शोधासाठी जवळपास ४० वर्षांचा अभ्यास, निरीक्षणे आणि डेटा संकलन करण्यात आला आहे. तैवान, जपान आणि ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रज्ञांनी मिळून हा ऐतिहासिक शोध लावला आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर ४६.५ अब्ज ते ६५.१ अब्ज मैलांदरम्यान आहे. इतक्या प्रचंड अंतरामुळे सूर्यप्रकाश तिथे अत्यंत क्षीण स्वरूपात पोहोचतो.

या ग्रहावरचे तापमान ३६४ डि. फॅ. ते -४०९ डि. फॅ. इतके अत्यंत थंड असू शकते, ज्यामुळे तो पूर्णतः बर्फाच्छादित असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या नवव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा १७ पट अधिक असून, तो युरेनस किंवा नेपच्यून इतकाच मोठा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल २५,००० वर्षे लागतात. शास्त्रज्ञांनी अभ्यासलेल्या १३ संभाव्य ग्रहांपैकी या नवव्या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अर्थात, आपण ज्या स्वरूपातील आहे की, कोणत्य जगातील स जीवसृष्टीची कल्पना करतो झाडे, प्राणी, मानव तशी नाही, पण अत्यंत कठीण आणि थंड हवामानातही टिकून राहणारे सूक्ष्म जीव (जसे की बॅक्टेरिया) येथे अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर पाणी अस्तित्वात असेल, तर ते ग्रहाच्या गाभ्याजवळ खोलवर साठवलेले असू शकते. २०१६ मध्ये व्यक्त केलेल्या या ग्रहाच्या अस्तित्वाच्या शक्यतेला आता ठोस आधार मिळाला आहे. जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक ऐतिहासिक घटना असून भविष्यात यावर आधारित अनेक संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.