समंथा म्हणाली, थांबवा हे, फोटोग्राफर मित्रांनो प्लिज !

 समंथा म्हणाली, थांबवा हे, मित्रांनो प्लिज !

भिनेत्री समंथा रुथ-प्रभू मंगळवारी सकाळी मुंबईत पापाराझींवर काहीशी नाराज दिसली. 'ईगा' या आगामी चित्रपटाच्या तिच्या वर्कआऊट सेशनमधून बाहेर येत असताना आणि फोनवर बोलत असताना पापाराझींनी तिला फोटो काढण्यासाठी विचारल्यानंतर संमथा संतापली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्हिडीओमध्ये समंथा ही वाइन रंगाच्या जिमच्या कपड्यांमध्ये दिसत असून ती फोनवर बोलत आहे. एका कॉम्प्लेक्समधून बाहेर येत असताना फोटोग्राफर तिला 'गुड मॉर्निंग' म्हणताना ऐकू येत आहे.

गाडीत बसण्यासाठी घाई करत म्हणाली, 'थांबवा हे, मित्रांनो. दुसऱ्या व्हिडीओमध्ये समंथा फोनवर बोलताना आणि तिची कार शोधताना दिसत आहे, तर फोटोग्राफर तिला फोटो आणि व्हिडीओसाठी

विचारत आहेत. ती फोटोग्राफरना फोटो न काढण्यास सांगताना आणि 'सॉरी मित्रांनो' म्हणत त्यांच्यामधून वाट काढताना दिसत आहे. फोटोग्राफरनी ऐकले नाही तेव्हा ती म्हणाली, 'अरे रुको जी प्लीज' आणि पुन्हा कॉम्प्लेक्समध्ये निघून गेली. चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका चाहत्याने म्हटले, 'हा निव्वळ छळ आहे ! ती फोनवरील संभाषणामुळे त्रस्त दिसत आहे.' 'तिला एकटे सोडा!' दुसऱ्या व्यक्तीने टिप्पणी केली आहे, 'त्यांना थोडा ब्रेक द्या. ती सुद्धा माणसंच आहेत.' खरेच, तुम्ही लोकांनी त्यांना थोडी प्रायव्हसी द्यायला हवी. त्यांनाही श्वास घेऊ द्या, असे तिसऱ्या एका म्हटले आहे.


No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.