जगभरात एकापेक्षा सर्वात महागडे परफ्यूम !
जगभरात एकापेक्षा एक महागडी परफ्यूम्स आहेत. मात्र, यातील सर्वात महागडे परफ्यूम कोणते, याची क्वचितच सर्वांना कल्पना असेल.
सुमुख
सुमुख जगातील सर्वात महागडे म्हणून ओळखले जाणारे 'सुमुख' परफ्यूम फक्त दुबईमध्येच मिळते. याची किंमत मात्र १० कोटी रुपये इतकी अव्वाच्या सव्वा आहे. या परफ्यूमच्या बाटलीवर हिरे जडवलेले असतात, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य !
नबील
या परफ्यूमची निर्मिती नबील परफ्यूम ग्रुपने केलेली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सदर बाटलीचे डिझाईन दस्तुरखुद्द कंपनीचे सर्वेसर्वा असगर अली यांनीच केले आहे. या परफ्यूमची किंमत देखील १० कोटींच्या घरात पोहोचते !
क्लाईव्ह ख्रिस्तियन इम्पेरियल मॅजेस्टी
क्लाईव्ह ख्रिस्तियन इम्पेरियल मॅजेस्टी परफ्यूमची एका बाटलीची किंमत दहा लाखांच्या घरात आहे. हे परफ्यूम बक्करेट क्रिस्टल बॉटलमध्ये येते, ज्यावर १८ कॅरेट सोने व ५ कॅरेटचे हिरे जडवलेले असतात.
बक्करेट लेस लारमेस
बक्करेट लेस लारमेस परफ्यूमची किंमत ५.२ लाख रुपये इतकी आहे. हे परफ्यूम तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना १७६४ मध्ये झाली आहे.
क्लाईव्ह ख्रिस्तियन
क्लाईव्ह ख्रिस्तियन परफ्यूमदेखील महागड्या श्रेणीतील परफ्यूम म्हणून ओळखले जाते. या परफ्यूमची किंमत १.६० लाख रुपये इतकी आहे.
.jpg)


.jpg)


Post a Comment