भविष्य निर्वाह निधीचे पैसे आता एटीएम, यूपीआयद्वारे काढा
१ जूनपासून सेवेला प्रारंभ; सात कोटी खातेधारकांना होणार फायदा
पीएफ काढण्यासाठी आवश्यक काय ?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात 'ईपीएफओ'ने आपल्या सुमारे सात कोटींहून अधिक खातेधारकांसाठी १ जूनपासून एटीएम, यूपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. 'ईपीएफओ ३.०' हा नवा प्लॅटफॉर्म लाँच केला असून, यामुळे अनेक सुविधा सुलभ आणि सोप्या होणार आहेत.
'ईपीएफओ ३.०' या प्लॅटफॉर्ममुळे पीएफची रक्कम काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. याआधी पीएफमधून आगाऊ (अॅडव्हान्स) रक्कम काढण्यासाठी अनेक दिवस चालणारी वेळखाऊ प्रक्रिया पार पाडावी लागत असे. त्याचे नियमही किचकट होते; पण नव्या प्रक्रियेनुसार तीन दिवसांत स्वयंचलित पद्धतीने क्लेम सेटल करण्यात येणार आहेत. यामुळे जुनी वेळखाऊ पद्धत कालबाह्य होणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे देशभरात सात कोटींहून अधिक सदस्य आहेत. कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे त्याच्या वेळेला उपयोगी पडावेत, यासाठी अम मंत्रालयाने पुढाकार घेऊन
'ईपीएफओ ३.०' लाँव करण्याचे ठरवले आहे. 'ईपीएफओ'च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या कार्यकारी समितीने युनायटेड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सोबत सहयोगाला मंजुरी दिली आहे.
नवे बदल काय ?
एटीएम आणि यूपीआमधून काढा रक्कम : पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी आता यूपीआय आणि एटीएमचा वापर करता येईल.
ऑनलाईन बॅलन्स चेक, फंड हस्तांतरण : सदस्य त्यांच्या पीएफ बॅलन्सची माहिती ऑनलाईन पाहू शकतील. ते ही रक्कम त्यांच्या बैंक खात्यात हस्तांतरित करू शकतील
डिजिटल केवायसी अपडेट : मोबाईल ओटीपी व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून केवायसी अपडेट करता येईल.
सुरक्षेवर विशेष लक्ष : सर्व व्यवहार आणि अपडेटस् सदस्यांना सुरक्षितपणे उपलब्ध होतील.
एटीएममधून पैसे कसे काढणार?
'ईपीएफओ' एटीएम विड्रॉल कार्ड देईल. हे कार्ड त्यांच्या पीएफ खात्याशी लिंक असेल.
आता सुमारे ९५ टक्के क्लेम तीन दिवसांत स्वयंचलित मंजूर होतील.
क्लेम सेटलमेंटनंतर एटीएममधून विड्रॉल कार्डच्या माध्यमातून पैसे काढता येतील.
सदस्यांना त्यांच्या एकूण रकमेच्या ५० टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत पैसे काढता येईल

Post a Comment