मुंबई मध्ये खूप दिवसांनी लालबागची सफर झाली



लालबाग परळ हे मुंबईच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या मूळ सात बेटांपैकी एक होते. १८७० च्या दशकापर्यंत, परळ (पश्चिम) येथील पुनर्प्राप्त जमिनीवर अनेक कापूस गिरण्या स्थापन झाल्या होत्या. हळूहळू, औद्योगिकीकरणासह, परळ खूप प्रदूषित झाले. ते एक औद्योगिक क्षेत्र बनले आणि त्याव्यतिरिक्त गिरणी कामगारांसाठी निवासी जागा देखील बनली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गिरण्या हळूहळू कमी होत गेल्याने, ही जागा पुनर्वापर केली जात आहे


करी रोडच्या प्लॅटफाॅर्म वर तर  तिस पस्तीस वर्षांनी ऊतरलो असेन.


फोर्टमधे होतो. चर्चगेट ऐवजी CSMT ला ट्रेन पकडून भायखळ्याला ऊतरायचं, तिथून चालत चालत टाईम पास करत ताडदेवला यायचं ठरवलं होतं. 


ट्रेनमधे डोळा लागला तो थेट करी रोडला जाग आली. 


कित्येक दशकांनंतर करी रोडला ऊतरणं झालं. तिथून दक्षीण साईडने मेन रोडला  म्हणजे आंबेडकर रोडवर आलो. मेन रोड गाठेपर्यंत जी एरीया आहे तिथल्या वस्तीत आणि चाळींमधे अजीबात बदल झालेला नाही. 


एक दुर्बुद्धी सुचली. एकेकाळी मला प्रीय असणारा लाडू सम्राटचा वडा खायचं ठरवलं. 


Non Ac मधे वडा प्लेट साठ रूपये तर साबुदाणा वडा प्लेट 80 रूपये. दोन्ही सिंगल सिंगल मागवले तर मात्र 80. वडा प्लेटच मागवायचं ठरवलं.  


थोड्या वेळाने दोन कोमट वडे समोर आले. कव्हर एवढं जाड होतं, वड्यांमधली अर्धीमुर्धी भाजी चिवडली आणि बिल देऊन बाहेर पडलो.


तसाच पुढे ईन्कम टॅक्स ऑफीस समोर श्रीकृष्ण नावाचं होटेल गाठून वडा खायचं ठरवलं. दुकान विस वर्षांपूर्वीच बंद झालेलं. त्या होटेल मधे टेनीस बाॅलच्या आकाराचा वडा मिळायचा.


दादरच्या मामा काणेंकडे मात्र  वाट बघायची तयारी ठेवली तर जिभ पोळणारा वडा अजूनही मिळतो. सकाळच्या किंवा लंच टाईमच्या वेळी जाणं झालं तर या वड्यांबरोबर एक वाटी ऊकळती कढी मागवतो. दुपारी तिन नंतर कढी मिळत नाही. बरं ते असो, 


लालबागला एक जुनी टिपीकल पानाची गादी बघीतली. कच्ची पानं, पक्की पानं, कच्ची आणि पक्की सुपारी, पिवळा, जाडा, काळा, लूज मिळणारा पंढरपूरी, कळीच्या चुन्याच्या हिरव्या डब्या, या वस्तू गादीवरच दिसतात. अशा गाद्या आता बंदच झाल्या आहेत.


देठ वाली पानं म्हणजे कच्ची पानं, ही स्वस्त असतात पण चवीला  बेकार. यांचा ऊपयोग पूजेलाच करावा.


पक्की पानं चवीला मस्त असतात. देठं काढलेली असतात, पिवळी छटा असते या पानांना. या पानांच्या शिरा  नखांनी काढणं हे कौशल्याचं काम आहे.  मी अडकित्ता वापरून शिरा काढायचो. 


आपण, टोना, डेन्टोबॅक, अपोलो अश्या अनेक तंबाखूच्या पेस्ट्स वापरल्या असतील. पूर्वी कोकणातले लोक मशेरीचा तंबाखू मुंबई वरून मागवायचे. मशेरी भाजणं ही पण कला आहे. भाजताना वातावरणात जो खरपूस सुगंध दरवळतो, त्यापुढे दुबईची परफ्युम्स फेल आहेत.


जाताना लोअर परेलला चालत गेलो.  लोअर परेलचा पूल पूर्वी  कधीच वापरत नसे. ट्रॅकवर ऊडी मारून लोखंडी गजांचं कुंपण पार करून ये जा करायचो. आता ते मार्ग बंदच झालेत. 


खूप पूर्वी पुलाजवळ Eastern Bakery होती. ती आहे अजून. जागा खुप आकुंचीत झाली आहे. नानखटाई, बिस्कीटं वगैरे दुकानाबाहेरच्या फुटपाथवरच चालतं.  जुन्या मराठी मावश्या ही बिस्कीटं तयार करतात, ट्रे मधे निट arrange करतात, ट्रे सरळ भट्टीत जातो. बिस्कीटं तयार!


मित्रांनो,  तुमच्या हायजीनच्या कल्पना चुकीच्या आहेत. चहा अगदी रस्त्यावर जरी ऊकळला तरी त्याच्या टेंपरेचरने सगळे बॅक्टेरीया मरतात. Baked items चं पण तेच. ओल्या चटण्या मात्र टाळा, रस्यावरच्या तर अजीबात नकोत. 


मुंबई रेल्वे लाईनमुळे मधोमध कापली गेली आहे. दक्षीण मुंबईची वेस्टर्न बाजू समृद्ध आहे तर ईस्टर्न बाजू त्यामानाने गरीब आणि स्वस्त. Square foot च्या भावात दहा हजारांचा फरक सहज पडतो. 


पार्ल्याच्या पुढे हा फरक कमी होत जातो. नंतर कधीतरी मुंबईची Geography सांगेन.  मुंबई समजून घ्यायला ईझी आहे. चालायची तयारी हवी. मुंबईची माणसं जेवढी चालतात तेवढी ईतर शहरातली चालत नाहीत.


*Good Morning*

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.