आनंद वार्ता : मान्सून १३ मेपर्यंत अंदमानात येणार!


हवामान विभागाची घोषणा : दरवर्षीच्या तुलनेत यंदा ८ ते १० दिवस आधीच आगमन

 

 

 मान्सून यंदा आठ ते दहा दिवस आधीच निघण्याच्या तयारीला लागला असून, तो १३ मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज मंगळवारी (दि. ६ मे) भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे तो केरळात देखील वेळेआधीच दाखल होईल, अशी शक्यता आहे. मात्र, ती तारीख हवामान विभागाने घोषित केलेली नाही.गेले पन्नास दिवस देशभर उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले. बाष्पीभवनाचा वेगही वाढल्याने संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. त्यामुळे मान्सून तयारीला लागला आहे. मान्सून दरवर्षी अंदामान-निकोबार बेटावर १८ ते

 


 अंदमानात मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. प्रचंड वेगाने बाष्पीभवन झाल्याने संपूर्ण देशाला अशा ढगांनी घेरले आहे. उपग्रहाच्या साहाय्याने टिपलेले चित्र.

  •  निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात

  •  हवेचे दाब कमी झाल्याने हालचालींना वेग

  • सलग ५० दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम

 

२२ मेच्या सुमारास येतो. मात्र, तो यंदा किमान आठ ते दहा दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटावर येण्याच्या तयारीत आहे, असे सॅटेलाइटने टिपलेल्या हालचालींवरून दिसत असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला. त्यामुळे तो केरळमध्येसुद्धा किमान पाच ते सहा दिवस आधी दाखल होऊ शकतो, असे वरिष्ठ शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र, त्याबाबत हवामान विभागाने अजून स्पष्ट दुजोरा दिलेला नाही. 

राज्याचे तापमान ४० अंशांवर...

   राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट होताना दिसत असून, ४४ ते ४५ अंशांवर गेलेले तापमान ४० अंशांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी अकोला येथे संमिश्र

 सर्वाधिक ४०.३ अंश तापमानाची नोंद झाली.

  • मंगळवारचे तापमान...

 नाशिक ३५.३, सातारा ३७.२, सोलापूर ४०.२, मुंबई ३४.१, धाराशिव ४०, छत्रपती संभाजीनगर ३६.५, परभणी ३८, अमरावती ३८.४, बुलडाणा ३७, ब्रह्मपुरी ४०, चंद्रपूर ३९, गोंदिया ३६.६, नागपूर ३९, वाशिम ३९.५, वर्धा ३८.५, यवतमाळ ३९.४. अकोला ४०.३, पुणे ३७.२, जळगाव ३७.८, कोल्हापूर ३६.५, महाबळेश्वर ३०.७, मालेगाव ३९.२,

 काय आहे सध्याची स्थिती ?

  •  नैऋत्य मान्सूनची प्रगती १३ मेच्या सुमारास दक्षिण अंदमानातील समुद्राच्या काही भागांत तसेच आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांकडे जाण्याची शक्यता आहे.
  •  कोकण आणि गोवा राज्यांत ७ मे रोजी, तर मराठवाड्यात ८ मे रोजी वादळाची शक्यता
  •  गुजरात राज्याला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट
  •  मराठवाड्यातील काही ठिकाणी ताशी ७० ते ११० किमी वेगाने वादळी वारे वाहतील.
  • समुद्रसपाटीजवळ सध्या हवेचे दाब जास्त असून, ते जमिनीकडे कमी आहेत. त्यामुळे वार्याचा वेग समुद्राकडून जमिनीकडे जास्त वेगाने सुरू झाला आहे.
  •  पंजाब आणि वायव्य राजस्थानला लागून असलेल्या मध्य पाकिस्तानवर चक्राकार परिभ्रमण म्हणून पश्चिमी विक्षोभ कायम आहे.

 आज या जिल्ह्यांत गारपिटीचा अंदाज

 पुणे वेधशाळेतील निवृत्त हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, बुधवारी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सातारा, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथे विजांच्या कडकडाटांसह गारपीट होण्याची शक्यता आहे.

  •  अंदामानात मान्सून / अवामानात मान्सून 

  अंदमानात मान्सून दरवर्षी १८ते२२ मेच्या दरम्यान येतो. मात्र, यंदा तो १३ मेदरम्यान येईल, असा अंदाज आहे. म्हणजे सुमारे ८ ते १० दिवस आधीच तो दाखल होत आहे. केरळमध्ये तो कधी येईल, याचा अंदाज अजून आलेला नाही.  

- डॉ. एस. डी. सानप, वरिष् शास्त्रज्ञ, आयएडी, पुणे

नैऋत्य मान्सून १३ मेच्या सुमारास दक्षिण अंदामान समुद्र, बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागासह निकोबार बेटावर पुढे सरकण्याची शक्यता आहे. तो लवकर येईल का, याबाबत आत्ताच अंदाज बांधणे कठीण आहे. भारतीय हवामान विभाग १५ मेच्या आसपास तो अंदाज देईलच. मात्र, केरळमध्ये तो वेळेवर येईल, असे दिसते.

  - डॉ. कृष्णानंद होसाळीकर निवृत्त अतिरिक्त महासंचालक, आयएमडी, पुणे




No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.