अती लोभ कसा असतो ते पहा आणि त्यात खुश व संतुष्ट राहा.....

 खुश व संतुष्ट


 



आसफउद्दौला हा दानशूर राजा होता. त्याची ख्याती पंचक्रोशीत पसरली होती. एक फकीर त्याच्या महालासमोरून गात निघाला, जो न दे मौला, वो दे आसफउद्दौला असे त्या गाण्याचे बोल होते. ते ऐकून राजा खूष झाला. त्याने फकिराला सन्मानाने वाड्यात बोलावून एक कलिंगड दिलं. फकीर नाराज मनाने तिथून निघाला. या राजाची आपण एवढी कीर्ती ऐकली होती आणि त्याने देऊन देऊन दिलं काय, तर एक कलिंगड?

तो बाहेर पडत असताना दुसरा एक फकीर गाणं म्हणत मस्तीत निघालेला दिसला त्याला. तो गात होता 'मौला दिलवाए वही मिल जाए'. 

राजाने त्यालाही आत बोलावलं. तो काय घेऊन येतोय हे पाहण्यासाठी पहिला फकीर थांबून राहिला. दुसरा फकीर बाहेर आल्यावर दोघे सोबत चालू लागले. 

पहिला फकीर म्हणाला, या राजाकडे फुकट वेळ गेला माझा. त्याला मी देवापेक्षा मोठा बनवला आणि त्याने मला हे कलिंगड दिलं. तुला काय मिळालं?

दुसरा फकीर म्हणाला, मला दोन मोहरा दिल्या त्याने.

पहिला फकीर चिडून म्हणाला, माझ्यापेक्षा तूच फायद्यात राहिलास.

दुसरा फकीर म्हणाला, मी काही फायदा तोटा पाहात नाही. मी त्याच्याकडे काही मागायला गेलोही नव्हतो. त्याने दिलं ते मी घेतलं. मला देणारा देव आहे. त्यामुळे इथे जमिनीवर जो दे उसका भला, जो न दे, उसकाभी भला, असा माझा उसूल आहे.

पहिला फकीर म्हणाला, इतका निर्मोही आहेस, तर दोन मोहरा मला दे, मी तुला हे कलिंगड देतो.

दुसऱ्या फकिराने संतोषाने ते घेतलं आणि तो निघून गेला.

काही दिवसांनी पहिला फकीर पुन्हा आसफउद्दौलाच्या महालासमोरून गाणं म्हणत जात होता. राजाने त्याला बोलावलं आणि आश्चर्याने विचारलं, तू अजूनही फकीरच आहेस. एवढ्या धनसंपदेचं केलंस काय?

फकीर आश्चर्यचकित होऊन दुखावलेल्या स्वरात म्हणाला, धनसंपदा? कसली धनसंपदा? हुजूर, तुम्ही विसरलात की तुम्ही मला फक्त एक कलिंगड दिलं होतं.

राजा म्हणाला, अलबत. त्या कलिंगडाचं तू काय केलंस? 

फकिराने सगळी गोष्ट सांगितली आणि आपण दोन मोहरांच्या बदल्यात त्या दुसऱ्या फकिराला ते देऊन टाकल्याचं सांगितलं. 

राजा विचारमग्न झाला आणि मग सिंहासनावरून खाली उतरून, गुडघ्यावर बसून आकाशाकडे पाहात हात पसरून म्हणाला, या खुदा, मी चुकलो. मला क्षमा कर.

फकीर म्हणाला, आता हे काय नवीन?

राजा म्हणाला, तुम्ही मला देवापेक्षा मोठा दाता ठरवलंत म्हणून मी तुम्हाला ते हिरे  माणकांनी भरलेलं कलिंगड दिलं. पण, तेे तुम्हाला लाभलं नाही. तो फकीर देव देईल तेवढ्यावरच खूष होता, संतुष्ट होता. ते तुम्हाला नाही, त्यालाच मिळालं. आता सांगा, खरा दाता कोण?.

तात्पर्य 

देव देईल जे मिळेल तेवढ्यावरच खुश राहणे, संतुष्ट राहणे. त्यांनाच सर्व मिळते.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.