अबब..! मुंबई मधील वरळीत तब्बल ६३९ कोटी रुपयांचे घर
देशातील सर्वांत मोठा गृह विक्री व्यवहार झाला आहे
वरळी येथे नमन ग्रुपचा 'नमन झाना' प्रकल्प सध्या सुरू आहे. या ४० मजली इमारतीमध्ये केवळ १६ घरे आहेत.त्यापैकी २२ हजार ५०० चौरस फुटांची दोन ड्युप्लेक्स घरे ६३९ कोटींना खरेदी करण्यात आली आहेत. प्रतिचौरस फूट २ लाख ८० हजार रुपये दराने या घरांची विक्री झाली आहे. पुढील वर्षी या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आहे. आतापर्यंत वरळी आणि मलबार हील येथे झालेल्या आलिशान घरांच्या व्यवहाराच्या दुप्पट किमतीचा व्यवहार 'नमन झाना'मध्ये झाला आहे. या ठिकाणी पूर्वी एका पारशी कुटुंबाचा बंगला होता. इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या घराच्या बाजूलाच हा भूखंड आहे. या भखंडाच्या विक्रीतून मिळालेली
मोजावी लागेल.तृणमूलच्या लोकांना हवे गरिबांकडूनही कमिशनरक्कम पारशी कुटुंबीय धर्मादाय संस्थेला दान करणार आहेत.सागरी किनारा नियमन क्षेत्राचे निकष शिथिल केल्यानंतर जी नवी विकासकामे सध्या सुरू आहेत, त्यापैकी सर्वाधिक किमतीचे व्यवहार झालेल्या यादीत 'नमन झाना'चे स्थान सर्वात वरचे आहे. काही वर्षांपूर्वी उदय कोटक यांनी हा भूखंड विक्रमी किमतीत खरेदी केला होता

Post a Comment