भारत सर्व प्रकारे सज्ज आहे...

 

  लष्कर,नौदल,हवाई दल,कुटनीती

नवी दिल्ली :  पाकिस्तानची हेकडी जिरवण्यासाठी भारत सर्व प्रकारे सज्ज झाला आहे. लष्कर, नौदल, हवाई दल तसेच कूटनीतीतही तो पाकिस्तानपेक्षा सरस ठरला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' असो, पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना अपयशी करण्यात असो किंवा पाकिस्तानातील विविध शहरांमधील ड्रोन हल्ले, सर्वच बाबतीत भारताने मजबूत आघाडी घेतलेली आहे.


 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये राफेल जेटस्ने २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताकडे SCALP आणि HAMMER सारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचे भांडार आहे. S-४००, बराक-८, आकाश, स्पाईडर यांसारखे हवाई संरक्षण प्रणाली भारताला अभेद्य बनवतात. भारताकडे १.४ दशलक्ष सक्रिय सैनिक, T-९० भीष्म, अर्जुन टैंक, K९ वज्र तोफा, आणि ब्रह्मोस क्रूझ मिसाईलसारखी अचूक मारक शस्त्रे आहेत पाकिस्तानच्या तुलनेत भारत तंत्रज्ञान आणि सैनिकी ताकदीत खूप पुढे आहे. INS विक्रांत आणि विक्रमादित्य विमानवाहू पोत, कलवरी श्रेणीच्या पाणबुडी आणि ब्रह्मोस मिसाईलने सज्ज युद्धनौका भारताच्या नौदलाला अपराजेय बनवतात. अरब सागरात भारताने पूर्ण घेराबंदी केली आहे. पाकिस्तानकडे केवळ ५ जुनाट पाणबुडी आणि काही चिनी फ्रीगेटस् आहेत. भारताकडे अग्नी-५ मिसाईल (५,००० कि.मी. रेंज) आणि INS अरिहंत परमाणु पाणबुडी आहेत. भारताची बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रणाली (BMD) शत्रूकडून असलेले सर्व धोके टाळू शकते.

भारताची RAW आणि सायबर कमांडने 'ऑपरेशन सिंदूर 'मध्ये निर्णायक माहिती पुरवलीः ISRO चे सॅटेलाईट पाकिस्तानवर सतत लक्ष ठेवतात. भारत सायबर युद्धात पाकिस्तानची ऊर्जा आणि दळणवळण प्रणाली ठप्प करू शकतो. कूटनीतीक ताकदीचा विचार करता आपल्या जबरदस्त कूटनीतीमुळे जग भारताच्या बाजूने उभे राहिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका, रशिया, इस्रायल आणि फ्रान्स भारताच्या पाठीशी उभे आहेत. पाकिस्तानला फक्त चीन आणि तुर्कीचा तोंडी पाठिंबा मिळालेला आहे.


 

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.