कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ कशीअसते....

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ



एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.


संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?

चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.

हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.

संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करून

चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.


तात्‍पर्य :- पापाची कमाई दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.


No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.