शेतकरी मित्रांनो नमस्कार, (माहिती जंक्शन) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण तैवान पेरू लागवड करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये तैवान पेरूसाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, तैवान पेरूच्या लागवडीची पद्धत आणि पाणी व्यवस्थापन तसेच काढणी आणि उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील शेतकरी आता जास्त प्रमाणात फळबाग लागवडीकडे वळत आहेत. महाराष्ट्रातील फळबागांची उतरण पाहिले तर विभागनिहाय दिसून येते. उदाहरणच द्यायचे झाले तर नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब आणि द्राक्ष, जळगाव जिल्हा म्हटले म्हणजे केळी आणि विदर्भ म्हटले म्हणजे संत्रा. परंतु आता बरेचसे शेतकरी आहेत की ते पेरू लागवडी कडे वळत आहे. पेरू हे फळ पीक कमी खर्चात व कमी मेहनतीत चांगले उत्पन्न देते. या लेखात आपण तैवान पिंक पेरू लागवड विषयी माहिती घेणार आहोत.
या लेखातील प्रमुख विषय तैवान पेरू
- हंगाम, जमीन व पाणी
- लागवड अंतर
- लागवड करताना
- खत व्यवस्थापन
- छाटणी
- पाणी व्यवस्थापन
- पेरू कीड नियंत्रण
- अ. फळमाशी
- ब. साल पोखरणारी अळी
- क. पिठ्या ढेकूण
- ड) स्पायरीलिंग पांढरी माशी
- पेरू रोग नियंत्रण
- 1. देवी रोग –
- 2. फळे सडणे –
- 3. फांद्यावरील खैऱ्या रोग
- पेरू फळांची काढणी आणि उत्पन्न
- तैवान पिंक पेरू रोपाची किंमत
- बाजारपेठेत तैवान पिंक पेरुची किंमत
- सतत विचारले जाणारे प्रश्न
तैवान पेरू
1. बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान पेरू.
2. साधारणपणे या पेरूचे वजन 500 ग्रॅम असते. हा पेरू आकाराने मोठा असतो.
3. या पेरुचे वैशिष्ट्य म्हणजे आत मधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो जो चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो.
हंगाम, जमीन व पाणी
1. पेरूच्या झाडाची बारा महिने लागवड करता येते.
2. पेरू साठी काळी,लाल,मुरमाड, माळरानाची तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम असते.
3. कमी पाण्यामध्ये देखील हे पीक उत्तम घेता येते.
लागवड अंतर
6×10, 6×12, 8×12, 8.5×5 किंवा 6×9 घनदाट पद्धतीने लागवड केल्यास एकरी एक हजार रोपे बसतात.
लागवड करताना
1×1 चे खड्डे करावे व खड्ड्यात कुजलेले शेणखत टाकून रोपाची एका सरळ रेषेत लागवड करावी. पाण्यासाठी ड्रिप चा वापर करावा. त्यामुळे पाण्याची बचत होते व रोपांच्या गरजेनुसार पाण्याची मात्रा देता येते.
खत व्यवस्थापन
1. झाडाची वाढ जलद व्हावी यासाठी पहिली ४ वर्षे खताच्या योग्य मात्र द्याव्यात.
2. शेणखत २० ते २२ किलो प्रती झाड या प्रमाणे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच द्यावे.
3. लागवडीनंतर 6 महिन्यांनी 150 ग्रॅम नत्र 50 ते 60 ग्रॅम स्फुरद, 50 ग्रॅम पालाश द्यावे.
4. त्यानंतर पुढील वर्षापासून प्रतिझाड 800 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश अशी खतमात्रा 2 ते 3 हप्त्यामध्ये विभागून द्यावी.
छाटणी
1. महाराष्ट्रात पेरू पिकात प्रामुख्याने दोन बहार हंगाम आहेत.
2. पहिला वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वी, त्यालाच आंबे बहार देखील म्हणतात.
3. यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये बागेत छाटणी करून फुलबहार घेतला जातो व पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर च्या दरम्यान फळांची काढणी केली जाते.
4. दुसरा मृग बहार यामध्ये जुन ते जुलै च्या दरम्यान फुल बहार धरून नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान फळे काढली जातात.
5. आता आंबे बहार धरण्यासाठी बागेत छाटणी करून बहार नियोजन करावे.
6. एप्रिल ते मे च्या दरम्यान तापमान जास्त असल्यामुळे छाटणी करणे टाळावे.
7. छाटणी करताना जाड फांद्या ठेऊन बाकीच्या सर्व बारीक काड्या काढून टाकाव्यात झाडाच्या मुख्य खोडापासून आलेल्या चार ते पाच उपयुक्त फांद्या आणि त्यानंतर आलेल्या लहान फांद्या अशा प्रकारे उघडलेल्या छत्री च्या आकाराप्रमाणे छाटणी करून खतांचे व पाण्याचे संतुलित नियोजन करावे.
पाणी व्यवस्थापन
1. पेरूचे झाड पाण्याचा ताण बराच काळ सहन करू शकते.
2. मात्र नवीन लागवडीला साधारणपणे जमिनीच्या मगदुरानुसार 10 ते 15 दिवसाच्या अंतराने द्यावे बुंधा भोवती दुहेरी आळे करून बाहेरील अळ्यास पाणी द्यावे.
3. उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 20 दिवसांनी पाणी द्यावे.
4. झाडाच्या वाढीनुसार आल्याचे आकारमान वाढवावे.
पेरू कीड नियंत्रण
अ. फळमाशी –
1. फळमाशीग्रस्त, बागेत पडलेली फळे यातून फळमाशीची उत्पत्ती वाढते.
2. ती टाळण्यासाठी फळे गोळा करून नष्ट करावीत.
3. फळे झाडावर पिकलेल्या अवस्थेत असताना झाडाखालची माती खुरप्याने 2 ते 3 सेंटीमीटर उकरून त्यावर क्लोरोपायरीफॉस 20% ईसी (टाटा- तफाबान) 2 मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे तयार केलेले द्रावण माती पूर्णपणे ओली होईपर्यंत फवारावे.
4. कामगंध सापळे हेक्टरी 5 या प्रमाणात लावून फळमाशी नष्ट करावी.
ब. साल पोखरणारी अळी –
कीड दिसून येताच क्लोरोपायरीफॉस 20% ईसी (टाटा- तफाबान) 20 मिलीची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
क. पिठ्या ढेकूण
1. निम तेल 30 मिली आणि इमिडाक्लोप्रिड 70% डब्लूजी (बायर कंपनीचे एडमायर) 6 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2. व्हर्टिसिलीयम लेकानी 1.15% डब्ल्यू पी 20 ग्राम प्रती 10 ली. पाणी या प्रमाणात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
ड) स्पायरीलिंग पांढरी माशी
1. बागेची खोलगट नांगरणी करावी. जमिनीत प्रत्येक झाडाच्या खाली 100 ग्राम मिथाईल पॅराथिऑन 2% डीपी (सागा पेस्टीसाइड, मिड-ऑन) मिसळावे.
2. खाली पडलेली पाने, फळे गोळा करून जाळावीत.
3. रक्षक सापळे हेक्टरी 10 लावावे.
पेरू रोग नियंत्रण
1. देवी रोग –
1. बागेतील रोगट फळे नष्ट करावी.
2. पावसाळ्यात झाडावर नवीन फुट येण्यापूर्वी आणि अर्धवट पोसलेल्या कोवळ्या पानांवर, फांद्यावर 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी (सिंजेंटा कंपनीचे अबिक) व बुरशीनाशकाच्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
2. फळे सडणे –
1. बागेतील रोगट, सडलेली, कुजलेली फळे वेचून नष्ट करावीत.
2. 20-25 ग्रॅम मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी (सिजेंटा कंपनीचे अबिक) 10 लिटर पाण्यात मिसळून जून ते ऑक्टोबर या काळात 2 ते 3 वेळा 15 दिवसाच्या अंतराने फवारावे.
3. फांद्यावरील खैऱ्या रोग
1. बागेतील रोगट फांद्या काढून नष्ट कराव्यात.
2. 20-25 ग्राम मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी (सिंजेंटा कंपनीचे अबिक) 10 लिटर पाण्यात मिसळून जून ते ऑक्टोबर या काळात 2 ते 3 वेळा 15 दिवसाच्या अंतराने फवारावे.
पेरू फळांची काढणी आणि उत्पन्न
1. 120-150 दिवसांच्या छाटणीनंतर पेरूची फळे काढणीस तयार होतात.
2. पेरूची झाडे उष्ण हवामानात वर्षभरात दोन पिके घेऊ शकतात.
3. शिवाय, एक मोठे पीक उन्हाळ्यात आणि एक लहान पीक हिवाळ्यात विकसित होते.
4. तथापि, फळे परिपक्व आणि कापणीसाठी तयार आहेत की नाही हे ओळखण्यासाठी, फळे फिकट हिरव्या रंगाची रंगद्रव्ये दिसतात.
5. परिपक्व झालेली फळे झाडांवर जास्त काळ ठेवू नयेत आणि पिकलेली दिसल्यावर त्यांची काढणी करावी.
6. कलम केलेल्या झाडापासून प्रति झाड 350 किलो पेरू तयार होतात.
7. शिवाय, प्रति एकर जमीन, उत्पादन 60-150 किलो किंवा 6 टन असू शकते.
तैवान पेरू रोपाची किंमत
35 रुपये प्रति झाड.
बाजारपेठेत तैवान पेरुची किंमत
40 ते 70 रूपये प्रति किलो
सतत विचारले जाणारे प्रश्न
1. पेरूची झाडे वाढण्यास किती वेळ लागतो?
उत्तर – पेरूची झाडे लागवडीनंतर 3 ते 4 वर्षात फळ देणारी होतात .शिवाय एका झाडाचे उत्पादन दरवर्षी 23-36 किलो किंवा त्याहून अधिक असू शकते.
2. एका एकरात किती पेरू लावू शकतो?
उत्तर – एका एकरात 132 पेरूची रोपे लावता येतात. शिवाय, मुळे 25 सेमी खोलीवर पेरली पाहिजे . आणि लागवडीसाठी, 6×5 मीटर अंतर ,त्यानंतर 7 मीटर अंतर ठेवण्यास प्राधान्य दिले जाते.
Post a Comment