शेतकऱ्यांनो काळजी घ्या! या जिल्ह्यांना रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

 राज्यात गेल्या 24 तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, काही भागांत संततधार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत केलं आहे. विशेषतः मुंबई, बारामती, कर्जतसारख्या शहरी भागांमध्ये रस्त्यांवर नदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, पुणे शहरात मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


शेतकऱ्यांना मोठा फटका

दुसरीकडे या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.लागवड केलेली पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.हवामान विभागाचा अलर्ट


मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील 4 तासांसाठी मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत:

रेड अलर्ट : मुंबई, नवी मुंबई, रायगड

ऑरेंज अलर्ट : ठाणे, पालघर

यलो अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक

या भागातील नागरिकांनी प्रवास टाळावा,सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

पावसाचा मॉन्सूनचा पूर्ववेध?

गेल्या काही वर्षांत जसा मॉन्सून उशिरा दाखल होत होता, यंदा मात्र त्याने सामान्य वेळेपेक्षा दोन आठवडे आधीच महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. रविवार, 24 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मान्सूनने आगमन केले. यासोबतच कर्नाटक आणि गोवा भागातही मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.

याचा परिणाम म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक जाणवतोय. हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस ही पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.