संपुर्ण महाराष्ट्रत पडत आहे पाऊस थंड वातावरणात खाऊ गरमगरम वडापाव मग घरीचबनवा वडापाव रेसिपी....

वडापाव बनवण्यासाठी, प्रथम बटाट्याचे वडे तयार करावे लागतात. बटाटे उकडून, किसून, त्यात मसाले आणि हिरवी मिरची मिक्स करावी लागते. या मिश्रणाला वड्यांचा आकार देऊन गरम तेलात तळून घ्यावे. त्यानंतर, पाव किंवा ब्रेड मधोमध कापून, आतमध्ये बटाट्याचे वडे भरून, चटणी आणि हिरवी मिरची सोबत सर्व्ह करावे. 

घटक

 4 जणांना

  1. 12 बटाटे
  2. 2 टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट
  3. 2 टेबलस्पून भरपूर कोथिंबीर
  4. 1 चमचा उडदाची डाळ
  5. चवीनुसार मीठ
  6. फोडणीचे साहित्य
  7. 2 टेबलस्पून तेल
  8. 2 टेबलस्पून मोहरी
  9. 1 चमचा हिंग
  10. कुकिंग सूचना
  11. १)प्रथम बटाटे उकडून घ्या आणि थंड झाले की त्याची साले काढून स्मॅश करून घ्या.
  12. २)बटाटे उकडे पर्यंत एका वाडग्यात चणाडाळ पीठ,ज्वारीचे पीठ, तिखट,मीठ, हळद घालून मिक्स करावे आणि कोमट पाण्यात भिजवून बॅटर तयार करावे हे बॅटर जास्त घट्ट असू नये किंवा पातळ असू नये. यामध्ये कोणी सोडा देखील घालतात.. पण मी घालत नाही.
  13. ३)आता कढईत तेल टाकून मोहरी हिंग हळद घालून चरचरीत आणि खमंग फोडणी करून घ्यावी. नंतर त्यात कढीपत्ता, उडदाची डाळ.थोडी कोथिंबीर घालावी. उडदाची डाळ लालसर झाली की यात आलं लसूण मिरची पेस्ट घालावी आणि एक मिनिट परतून घ्यावे. नंतर यात कुस्करलेले बटाटे घालून मिश्रण एकजीव करावे. चवीनुसार मीठ घालावे आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यावे. भाजी थंड झाली की त्यात भरपूर कोथिंबीर घालून भाजी मिक्स करावे आणि त्याचे वडे करून घ्यावेत.
  14. ४)आता कढईत तेल तापत ठेवावे आणि तयार केलेल्या बॅटरमध्ये एकेक वडा घोळवून तळून घ्यावे. अशाप्रकारे सर्व वडे सोनेरी रंगावर खमंग खरपूस तळून घ्यावेत.हिरव्या चटणीसाठीचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे..तसेच लसूण चटणीचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे..
  15. ५)तयार झालेले वडे हिरवी चटणी, लसणाची चटणी, तळलेली हिरवी आणि पावासोबत सर्व्ह करावे.
  16. ६)तयार झालेले वडे तळलेली हिरवी आणि पावासोबत सर्व्ह करावे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.