राज्यात शेतकऱ्याच झालेल्या ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
उन्हाळी पिकांना मुसळधार पावसाचा फटका; बळीराजा चिंतेत
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढून ४० हजार ९४९ हेक्टरवर पोहचला आहे. त्यामध्ये उन्हाळी हंगामातील बहुतांश पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अमरावती, बुलडाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
लावली असून, कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला.
राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बहुतांश जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीस सुरुवात झाली. जवळपास गेले २० दिवस पावसाने ३४ तालुक्यांत हजेरी
खरीप पेरण्याही लांबण्याची शक्यता
उन्हाळी हंगामातील भात, मूग, उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, टोमॅटो, कांदा-बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंब्याचे नुकसान झाले आहे. तसेच, अन्य फळबागांना हानी पोहचली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी तयार केलेल्या भात रोपवाटिकाही वाया गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे जमिनीला वाफसा लवकर येण्याची चिन्हे कमी असल्याने खरीप हंगामातील पेरण्याही लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पावसाने प्रमुख जिल्ह्यांत झालेले पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये) :
अमरावती १२,५६५, अकोला ९०९, चंद्रपूर १,५७२, बुलडाणा ६,६९९, जळगाव ४,५३८, पालघर ७९६, लातूर ९५७, जालना १,७२६, छत्रपती संभाजीनगर ४५६, सोलापूर १, ६८२, अहिल्यानगर १,४४१, नाशिक ३,५२३, पुणे ६७६, कोल्हापूर ९५, सांगली ६, सातारा ७३.
Post a Comment