चर्चेतला चेहरा बुकर विजेत्या बानू मुश्ताक यांची कहाणी

'कोणतीही 'गोष्ट' कधीच किरकोळ नसते या विचारातून माझं 'हार्ट लॅम्प' हे पुस्तक जन्माला आलं, मानवी अनुभवाच्या जगात प्रत्येक छोट्याशा धाग्यालाही संपूर्ण गोष्टीएवढंच महत्त्व आहे', अशी भावना बुकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक यांनी व्यक्त केली आहे. 'सतत परस्परांमध्ये दुफळी माजवण्याच्या प्रयत्नांमध्ये असलेल्या आजकालच्या जगात साहित्याला मात्र अजूनही थोडं पावित्र्य आहे, काही पानांपुरतं का होईना, पण इथे आपण एकमेकांच्या मनात आणि मेंदूत थोडी जागा व्यापून राहू शकतो', असं मुश्ताक म्हणतात.

बानू मुश्ताक यांच्या 'हार्ट लॅम्प' या कन्नड लघुकथा संग्रहाला नुकतंच 'बुकर' पुरस्काराने गौरवण्यात आलं. मुश्ताक यांनी त्यांचे मूळ कन्नड पुस्तक इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या दीपा भास्ती यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. जगभरातील सहा पुस्तकांमधून बानू मुश्ताक यांच्या 'हार्ट लॅम्प'ची निवड बुकरसाठी करण्यात आली. कौटुंबिक आणि सामाजिक ताण यांचं चित्रण करताना त्यांनी वापरलेला विनोद, वैविध्य, बोलीभाषा अत्यंत भावल्याचं निवड समितीने म्हटलं आहे.

मुश्ताक यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांनी मुलीला वयाच्या आठव्या वर्षी कन्नड

माध्यमाच्या शाळेत घातलं. कन्नड भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मुश्ताक यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. वयाच्या २६ व्या वर्षी मुश्ताक यांनी आपल्या पसंतीच्या तरुणाशी विवाह केला. लग्नानंतर सुरुवातीची वर्षे त्यांच्यासाठी अवघड होती. पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांना 'पोस्टपार्टम डिप्रेशन'ने ग्रासलं. त्या भरात त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीच्या ते लक्षात आल्यानंतर 'मला आणि आपल्या बाळाला सोडून जाऊ नकोस', असं म्हणत आपल्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलं असं मुश्ताक यांनी काही मुलाखर्तीमध्ये सांगितलं आहे.

धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ अंधश्रद्धेच्या रूपात लावण्याला मी सातत्याने विरोध करत आले आहे. त्याचे परिणामही मी भोगले आहेत. समाज खूप बदलला हे खरं असलं तरी समाजापुढचे प्रश्न मात्र आजही तेच आहेत, म्हणूनच माझ्या लेखनाच्या केंद्रस्थानी ते प्रश्न आहेत असं मुश्ताक सांगतात.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.